हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – टीम इंडियाचे माजी कर्णधार, 1983 च्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य आणि समालोचक सर्वांचे लाडके ‘लिटील मास्टर’ अर्थात सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या मातोश्री मीनल गावसकर यांचे आज वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजराने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले आहे. मीनल गावसकर या गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या.
वडिलानंतर मामांना गमावलं आता मातृछत्र हरपलं
सुनील गावसकर (sunil gavaskar) यांच्या वडिलांचं निधन वयाच्या 88 व्या वर्षी 30 मे 2012 रोजी झालं. त्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू आणि सनुील यांचे मामा माधव मंत्री यांचे 23 मे 2014 साली वयाच्या 93 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यानंतर आता त्यांच्या मातोश्री मीनल गावसकर यांचे वयाच्या 95 व्या वर्षी प्रदीर्घ आजराने निधन झाले आहे.
गावसकर यांची क्रिकेट कारकीर्द
सुनील गावसकर (sunil gavaskar) यांनी टीम इंडियाचं 125 कसोटी आणि 108 एकदिवस सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. गावसकर यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1 शतक आणि 27 अर्धशतकांसह 3 हजार 392 धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये 125 सामन्यांतील 214 डावांमध्ये 21.12 च्या सरासरीने 4 द्विशतक आणि 34 शतकांसह 10 हजार 122 धावा केल्या आहेत.
हे पण वाचा :
आता घरबसल्या अशा प्रकारे दुरुस्त करा Pan Card मधील चुका
शिवतारेंचा पवारांवर निशाणा; तुम्ही बेळगावला जाऊन काय करणार?
हिवाळ्यात ‘या’ भाज्यांच्या लागवडीद्वारे मिळवा भरपूर पैसे
मला मोदी आणि केंद्राचा आशीर्वाद पाहिजे; केजरीवालांच्या विधानाने चर्चाना उधाण
राम गोपाल वर्मा यांचा ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; अभिनेत्रीसोबत करत होते…