गुगल फोटोंवर पिक्चर्स ट्रान्सफर करण्यासाठी फेसबुकने लाँच केले नवीन टूल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फेसबुकचे गुगल फोटो ट्रान्सफर टूल आता जागतिक स्तरावरील प्रत्येकासाठी उपलब्ध झाले आहे. २०१८ मध्ये सुरुवात केल्या गेलेल्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, गूगल आणि ट्विटर यांचा देखील समावेश होता. हे टूल युझर्सचे आपल्या फेसबुक अकाउंटवरील सर्व फोटो तसेच व्हिडिओंच्या कॉपी तयार करते आणि त्या लिंक केलेल्या गुगल फोटोजमध्ये ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. … Read more

चिनी अ‍ॅपची आता खैर नाही; चीनच्या कुरघोडीनंतर भारतीयांचा संताप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा आघाडीचा शत्रू म्हणून पाकिस्तानचं नाव आता मागे पडू लागलं असून ही जागा आता चीनने घेतली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावानंतर भारतीय प्रदेश काबीज करण्याच्यादृष्टीने चीन करत असलेल्या प्रयत्नांमुळे भारतीयांचं पित्त खवळलं आहे. चिनी मालावर बहिष्कार टाकण्याची भाषा भारतीयांनी सुरु केली असून त्याची अंमलबजावणीही आता सुरु झाली आहे. अँडॉईड फोनमधील चिनी अ‍ॅप्स ओळखून … Read more

‘भीम’ ऍपचा डाटा चोरीला? मोदी सरकारने केला ‘हा’ खुलासा

नवी दिल्ली । कॅशलेस किंवा डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून जोरदार प्रचार करण्यात आलेल्या ‘भीम’ ऍप सध्या वादात सापडलं आहे. या ऍपचा डाटा लीक झाल्याचा दावा एका इस्रायली सायबर सिक्युरिटी फर्मनं केला होता. ‘व्हीपीएन मेन्टॉर’ या सायबर सिक्युरिटी फर्मनं केलेल्या दाव्यानुसार, भारतातील भीम ऍप वापरणाऱ्या ७२.६ लाख युझर्सचा डाटा लीक झाला आहे. परंतु, भारत … Read more

आता मोबाईल नंबर १० नव्हे ११ अंकांचा असेल; ‘हे’ आहे कारण

मुंबई । आता आपल्या हातात असलेल्या स्मार्ट फोनमधील सिम कार्डचा नंबर १० अंकांवरून लवकरच ११ अंकांचा होणार आहे. यासाठी सरकारने देखील एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडिया (TRAI) ने शुक्रवारी देशात ११ अंकांचा मोबाईल नंबर वापरात आणण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. त्या दिशेने काम देखील सुरू करण्यात आलं आहे. ट्रायच्या सांगण्यानुसार १० … Read more

.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि झुकरबर्गला ट्विटरच्या सीईओने दिला ‘हा’ इशारा

वॉशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटची सत्य पडताळणी (फॅक्ट चेक) केल्यानंतर ट्विटरवर ट्रम्प आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी टीका केली होती. त्यानंतर आता ट्विटरचा सीईओ जॅक डोर्सी यांनी यापुढेही ट्विट्सची सत्य पडताळणी करणार असल्याचे ठणकावले आहे.एखाद्या ट्वीटच्या सत्यतेबाबत शंका आल्यास युजरना ट्विटर त्याविषयी सावध करते. मात्र, हा नियम अमेरिकेच्या अध्यक्षांना लावण्यास … Read more

नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद करु; डोनाल्ड ट्रम्प यांची कंपन्याना धमकी

वाशिंग्टन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया कंपन्यावर भडकले आहेत. ट्रम्प यांचे ट्विट फॅक्टचेकअंतर्गत ट्विटरकडून अधोरेखित केल्यानंतर सोशल मीडिया कंपन्या आणि विशेष म्हणजे ट्विटरवर ते चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडिया कंपन्यांना चांगलीच शिस्त लावण्याचा आणि तसं न झाल्यास या कंपन्या बंद करण्याची धमकी ट्रम्प यांनी ट्विटरवर दिली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास … Read more

तुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे? फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा

नवी दिल्ली । सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही … Read more

आता 3D न्यूज अँकर सांगणार टीव्हीवर बातम्या; चीन मध्ये पहिला प्रयोग यशस्वी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील पहिली थ्रीडी न्यूज अँकर चीनमध्ये नुकतीच लाँच करण्यात आली आहे. चीनमधील एका सरकारी वृत्त संस्थेने या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामगिरी केली आहे. थ्रीडी तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेली ही जगातील पहिली न्यूज अँकर बनली आहे. चिनी सरकारी न्यूज एजन्सीने सिन्हुआमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या एका 3D न्यूज अँकरचा नुकताच समावेश केला … Read more

कोरोनाचा शोध घेण्यासाठी ‘हे’ स्मार्ट हेल्मेट तयार; संपूर्ण शरीर होणार स्कॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतो आहे. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी जगभरात आधुनिक साधने वापरली जात आहेत. अशातच इटलीमध्ये कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी स्मार्ट हेल्मेटचा वापर सुरू झाला आहे. या स्मार्ट हेल्मेटमध्ये कॅमेरा आणि थर्मल स्क्रिनर बसविण्यात आले आहेत. स्मार्ट हेल्मेट कोरोना विषाणूची तपासणी करेल रोम विमानतळावरील प्रवाशांना या स्मार्ट हेल्मेटच्या तपासणीतून … Read more

कोरोना संकटातही भारतातील ‘ही’ कंपनी कर्मचाऱ्यांना देणार चक्क ‘बोनस’

नवी दिल्ली । कोरोनामुळं तयार झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या आता वेतन कपात आणि कर्मचारी कपात करत असताना कर्मचारी बोनस आणि पगारवाढीची अपेक्षाही करू शकत नाहीत. पण एचसीएल टेक यासाठी अपवाद ठरली आहे. एचसीएल टेक्नोलॉजीसने आपल्या दीड लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. शिवाय कंपनीकडून गेल्या वर्षीच्या कामाचा … Read more