Sunday, January 29, 2023

Airtel चं ग्राहकांना गिफ्ट : 65 रुपयांचा लॉन्च केला नवा प्लॅन, मिळणार इतका डेटा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Telecom कंपनी Airtel कडून नेहमी आपल्या ग्राहकांसाठी काहीना काही तरी डेटा, रिचार्ज प्लॅन लॉन्च केला जातो. याहीवेळी कंपनीने आपल्या ग्राहकांना खुश करत नवीन डेटा प्लॅन नुकताच लॉन्च केला आहे. कंपनीनं गुपचूप 65 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला आहे. काही काळापूर्वी एअरटेलने आपला 199 रुपयांचा प्लॅन लॉन्च केला होता

नेमका काय आहे एअरटेल 65 चा प्लॅन?

एअरटेलने नुकत्याच लाँच केलेल्या डेटा प्लॅनबाबत माहिती घ्यायची झाली तर ज्यांचा रोजचा डेटा संपत असून ज्यांना अतिरिक्त डेटा हवा आहे अशा लोकांसाठी एअरटेल डेटा प्लॅन फायदेशीर ठरतो. या एअरटेल डेटा प्लॅनमध्ये कंपनीने 4 जीबी हाय-स्पीड डेटा दिला आहे. हा एक डेटा प्लॅन आहे. या प्लॅनसह कॉलिंग, एसएमएस किंवा कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त फायदे यासारखे इतर कोणतेही फायदे दिले जाणार नाहीत.

Airtel 65 रुपये प्लॅनची वैधता

- Advertisement -

एअरटेल ने लॉन्च केलेल्या 65 रुपयांच्या प्लॅनची ​​कोणतीही वेगळी वैधता नाही, म्हणजेच जोपर्यंत तुमच्या प्लॅनची ​​वैधता शिल्लक आहे तोपर्यंत हा प्लॅन चालणार आहे. जर तुमच्या विद्यमान प्लॅनची ​​वैधता 30 दिवसांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला या प्लॅनमधून रिचार्ज केल्यावर 30 दिवसांपर्यंत वैधता दिली जाईल. तुमचा प्राथमिक प्लॅन कालबाह्य होताच, या प्लॅनमधील शिल्लक डेटा देखील आपोआप कालबाह्य होणार आहे.