Wednesday, February 8, 2023

भाजपच्या मशीनमध्ये ED ची पावडर, शिंदे गटाला सुरुंग लावणार; शिवसेना नेत्याची टोलेबाजी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आणि शिंदे गटावर शिवसेना नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान शिवसेनेचे उपनेते भास्कर जाधव यांनी भाजप व शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. “शिंदे गटातील आमदार जास्त काळ समाधानी राहू शकणार नाहीत हे आम्हाला माहित होते. उद्धव ठाकरेंना सत्तेवरुन खाली आणण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले, पण त्यांनी शिवसेनेचे 40 आमदार फोडले. हेच 40 आमदार सुद्धा स्थिर राहू नये, यासाठी स्वत: भाजप प्रयत्न करत असून भाजपच शिंदे गटाला सुरुंग लावणार आहे. भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी,” असा टोला जाधव यांनी लगावला आहे.

भास्कर जाधव यांनी नालासोपारात कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा घेतला. यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिवसेना असो किंवा दुसरा पक्ष. जे जे भाजपात गेले ते सर्व क्लिन झाले आहेत. जे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसमध्ये किंवा त्यांच्या विरोधात आहेत ते चरित्रहीन आहेत. शिवसेनेत असणारे संजय राठोड यांचे प्रकरण भाजपाच्या चित्रा वाघ यांनी फार टोकाचे लावून धरले होते. पण आता त्याच म्हणाल्या की आपण आता विषय संपवूया. भाजपकडे कोणती मशीन आहे माहीत नाही, पण त्यांच्या मशीनमध्ये ED ची पावडर असावी.

- Advertisement -

ठाकरे गटातून फुटलेल्या आमदारांत सुरु असलेली नाराजगी, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रसेखर बावनकुळे यांनी शिंदे-फडणवीस या दोघांना संताजी धनाजीची दिलेली उपाधी, यासह गजानन किर्तिकारांचा शिंदे गटातील पक्षप्रवेश यावरून जाधव यांनी टीका केली.