भाजपाच्या ‘या’ राज्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या आवाहनंतर व्यापाऱ्यांचाही पाठिंबा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या मध्यप्रदेशात कोरोनाने चांगलाच हाहाकार केला आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनंतर मुख्यमंत्री शिवराज चाैहान यांनी राज्यातील सात जिल्ह्यातसह काही महत्वाच्या शहरात जनता कर्फ्यू लावला आहे. त्याला व्यापाऱ्यांसह नागरिकांनी कडकडीत बंद पाळला आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे लाॅकडाऊनची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. कोणत्याही क्षणी लाॅकडाऊन लागू शकतो, यांची चर्चा सर्वत्र सुरू आहे. त्याला भाजपाच्या नेत्यांकडून सकारत्मकता दाखवली गेली आहे. मात्र त्यासाठी काही अटी व मागण्या असल्याचे भाजपाच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. अशावेळी भाजपाची सत्ता असणाऱ्या मध्यप्रदेशमध्ये १२ एप्रिल ते १९ एप्रिल असा दहा दिवसांचा सात जिल्ह्यासह मोठ्या शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे.

मध्यप्रदेशात जनता कर्फ्यू लावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आवाहन केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री शिवराज चाैहान यांनी भोपाल, इंदाैर, जबलपूर, छिंदवाडा, नरसिंहपूर, सिवनी, ग्वालियर, बैतूल, बालाघाट, मंदसाैर, रतलाम, होशंगाबाद याठिकाणी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री चाैहान यांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद देतील, तसेच कोरोनाला आपण एकत्रित येवू हरवणार असे टि्वटही केले आहे.

You might also like