दहावी बारावीचे परीक्षा केंद्रे दुपटीने वाढली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद विभागीय मंडळातील जिल्ह्यांतून दहावीच्या परीक्षेसाठी ६२६ तर, बारावीसाठी 408 मुख्य केंद्रे निश्चिती झाली होती. मात्र, प्रवेशित शाळा, महाविद्यालयातच परीक्षेचे नियोजन करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विभागात मुख्य केंद्रांना संलग्नित शाळा, महाविद्यालयांत दहावीसाठी एक हजार 822; तर बारावीसाठी 855 या उपकेंद्रांवरही परीक्षेचे नियोजन विभागीय मंडळाकडून करण्यात येत आहे.

दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च तर, लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान व लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्चदरम्यान होईल. दहावी बारावीच्या परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर तर प्रात्यक्षिक 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित होतील. विभागातून दहावीसाठी एक लाख 81 हजार 602 तर, बारावीसाठी एक लाख 55 हजार 809 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत.

औरंगाबाद विभागीय मंडळातील मुख्य केंद्रे, त्यासाठी परीक्षकांची नियुक्ती पूर्ण झाली असून वाढीव केंद्रांची पूर्वतयारी सुरू आहे. संलग्न शाळा, महाविद्यालयांना उपकेंद्र देण्यात येणार असून त्याची तयारीही जवळपास अंतिम टप्प्यात आहे. परीक्षार्थ्यांना बसण्याची बेंच, कक्षात पंखे, लाइट, केंद्रावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी भौतिक सुविधांच्या तयारीसह परीक्षेच्या नियोजनासंदर्भात जिल्हानिहाय बैठका विभागीय मंडळ घेणार आहेत. त्यात सुरवातीला शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांची बैठक होईल.

Leave a Comment