हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमध्ये कोरोनानंतर आता आगीचा कहर वाढला आहे. चीनच्या नैऋत्य प्रांतातील सिचुवान प्रांतात जंगलात लागलेली भीषण आग विझवताना १९ जणांचा मृत्यू. ‘झिनहुआ’ या अधिकृत वृत्तसंस्थेने सविस्तर माहिती न देता मंगळवारी या लोकांच्या मृत्यूची माहिती दिली.
शहराच्या माहिती कार्यालयाने सांगितले की, सोमवारी दुपारी जोरदार वार्यामुळे शेजारच्या शेतात आग पसरली. लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून ३०० हून अधिक अग्निशमन कर्मचारी आणि ७०० सैनिक मदतीसाठी पाठविण्यात आले आहेत.
१२०० लोकांना सुरक्षित बाहेर हलविण्यात आले. शहराची लोकसंख्या सुमारे ७,००,०००आहे, आगीनंतर घरे आणि रस्त्यावर धुराचे ढग होते. दक्षिण-पश्चिम प्रांतातील डोंगराळ लिंगशान प्रांतातील झांगजवळ सोमवारी दुपारी ३ वाजताही आग लागली.
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलासह चार हेलिकॉप्टर आणि सुमारे 900 अग्निशमन दलाला बचाव कार्यासाठी पाठविण्यात आले आहे.१,२००हून अधिक स्थानिकांना बाहेर काढण्यात आले आहे.गेल्या वर्षी एप्रिलमध्ये याच प्रांताच्या मुळी काउंटीमध्ये मोठ्या प्रमाणात जंगलाच्या आगीत २७ अग्निशामक ठार झाले. अधिकार्यांनी घटनास्थळी ७०० अग्निशामक दलाला तैनात केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’
हे पण वाचा –
कोरोनापासून बचावासाठी न्यूयॉर्क सरकारचा नागरिकांना हस्तमैथुन करण्याचा सल्ला !!!
धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदारानं थाटात केलं मुलीचं लग्न
जगभरात कोरोनाच्या घटनांची संख्या सात लाखांच्या पुढे,मृतांचा आकडा ३३ हजारांपेक्षा जास्त
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी वेंटिलेटर का महत्वाचे? घ्या जाणुन
तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका