मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं असतानाच आता ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के EWS (economic weaker ) आरक्षणाचा लाभ घेता येईल. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात आणि नोकरीमध्ये ईडब्ल्यूएसच्या 10% आरक्षणाचा लाभ मराठा युवकांना मिळणार आहे.

दरम्यान, सरकारच्या या आदेशामुळे सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार EWS आरक्षणाचा 10% लाभ घेऊ शकतात. राज्यात मराठा आरक्षण लागू असताना मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षणाचा फायदा घेता येत नव्हता तसा निर्णय सरकारने घेतला होता. आता मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment