हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यामार्फत उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची केंद्राकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती करेल, असे आश्वासन दिले आहे. तसेच महाराष्ट्राचे वैभव पुन्हा प्राप्त करून देईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी जनतेला दिला आहे. इतकेच नव्हे तर, “स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करु, शेतकऱ्यांना लागणारी खतं, बी – बियाणं जीएसटी मुक्त करू” अशी विविध आश्वासने ठाकरे गटाकडून देण्यात आली आहेत.
ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यातील आश्वासने
– बेरोजगारी, शेतकरी, महिला, उद्योग या मुद्द्यांवर काम करणार.
– राज्यांतील शेतकऱ्यांना गोदामे देण्यासाठी प्रयत्न करणार.
– सर्व राज्यांना समान विकासाची संधी देणार.
– राज्यात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कटिबद्ध राहू.
– खतं, बी-बियाणे जीएसटीमुक्त करणार.
– पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव आम्ही स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करणार.
– संविधानाचं रक्षण करणं हे प्रमुख उद्दिष्ट असेल.
– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासासाठी आम्ही प्रयत्न करणार.
दरम्यान, “काँग्रेसने, इंडिया आघाडीने, राष्ट्रवादीने जाहीरनामे प्रसिध्द केले आहेत. परंतु आम्ही महाराष्ट्रासाठी ज्या काही गोष्टी प्राधान्याने व्हायला पाहिजे, त्या वचननामाच्या माध्यमातून प्रकाशित करत आहोत. मी शिवसेनेच्या वतीनं जनतेला विनंती केलीय की, तुमचे आशीर्वाद असुद्या.” असे उद्धव ठाकरे यांनी म्हणले.