ठाणे : हॅलो महाराष्ट्र – मुंबई-नाशिक महामार्गावरील माजिवडा भागात एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये एका भरधाव ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगत असलेल्या झोपडीवर उलटला. या घटनेत झोपडीमध्ये झोपलेल्या 14 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. मधू भाटी असे या अपघातात (accident) मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
काय घडले नेमके ?
मुंबई-नाशिक महामार्गालगत ठिकठिकाणी झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. माजिवडा भागातही अशाचप्रकारे झोपड्या आहेत. शुक्रवारी सकाळी ठाण्याहून नाशिकच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गावरून एक ट्रक जात होता. त्यावेळी ट्रक समोर असलेल्या एका गाडीने अचानक मध्येच गाडी थांबवली त्यामुळे ट्रक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्यालगत असलेल्या एका झोपडीवर जाऊन (accident) उलटला.
यावेळी झोपडीमध्ये झोपलेल्या 14 वर्षीय मधू भाटी हिच्या अंगावर हा ट्रक उलटल्याने (accident) तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. हा ट्रक क्रेनच्या सहायाने बाजूस करून मधूला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु तिचा त्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या अपघाताप्रकरणी (accident) पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???