माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार… तुरुंगातून सुटताच या अभिनेत्याने केलं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अभिनेता एजाज खान ला अटक झाली होती. मात्र तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एक ट्विट केल आहे. माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. अखेर न्यायाचा विजय झाला. माझे वकिल नाजनीन खत्री आणि जोहेब शेख यांचे मनापासून आभार. धन्यवाद!” अशा आशयाचे ट्विट करत अभिनेता एजाज खान याने सर्वांचे आभार मानले आहेत.

दरम्यान एजाज खान याने आपल्या फेसबुक लाईव्ह दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणारी काही वक्तव्य केली होती. यासाठी पोलिसांनी त्याला अटक देखील केली. मात्र शुक्रवारी त्याला जामीन मिळाला आणि त्याची तुरुंगातून सुटका झाली. परंतु तुरुंगातून बाहेर येताच त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.

 

एजाज खान याने 15 एप्रिल ला रात्री फेसबुकवरुन एक लाइव्ह व्हिडीओ केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने वादग्रस्त वक्तव्य करुन ‘कायम मुस्लीम नागरिकांना दोषी धरल होत. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment