त्यामुळेच गुजरातचे ‘अकार्यक्षम मॉडेल’ देशापुढे उघड झालेय ; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मोदींवर टीका

0
36
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या या महामारीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. कधी निवडणुकीवरून तर कधी कोरोनात घेतलेल्या निर्णयावरून मोदींना विरोधकांकडून टार्गेट केलं जात आहे. आता गुजराच्या सार्वत्रिक निवडणुकीत ‘गुजरात मॉडेल’चा केला गेलेला वापर यावरून गुजरात उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आता काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी “गुजरात न्यायालयाच्या नाराजीमुळेच गुजरातचे अकार्यक्षम मॉडेलच आता देशापुढे उघड झाले आहे,” अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

गुजरात राज्याच्या २०१४ रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाने ‘गुजरात मॉडेल’चा सर्वत्र गाजावाजा केला होता. तसेच संपूर्ण देशात या मॉडेलचा वापर करीत आपले उमेदवार निवडून आणले होते. मात्र, कोरोनाच्या या महामारीला हाताळण्यात गुजरातमधील भाजपला अपयश आले असल्याने याबाबत गुजरात न्यायालयानेही नाराजी व्यक्त करीत प्रखंड्पणे विचारणा केली आहे. असे म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी मोदींवर टीका केली आहे. तसेच त्यांनी पुढे म्हंटल आहे कि, “एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये एका ठिकाणी शेकडो प्रेतांना अग्नी दिला जात आहे. तर दुसरीकडे गंगा नदीतुन मोठ्या संख्येने प्रेत वाट आहेत. हि छायाचित्रे सध्या सर्वत्र पहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश हे आता नाथांचे नसून अनाथांचे राज्य बनत चालले आहेत, अशीही टीका गाडगीळ यांनी केली आहे.

गाडगीळ यांनी यावेळी गोव्यातील ऑक्सिजनभावी मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मुद्यावरूनही भाजपला टोला लगावला आहे. “मुख्यमंत्र्यांवर राणेंची (विश्वजीत) आगपाखड़” हे महाराष्ट्रात नव्हे तर गोव्यात भाजपमधील दररोजचे चित्र आहे, असे गाडगीळ यांनी म्हंटल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपची सत्ता असलेल्या राज्यात अशी परिस्थिती असल्याने याबाबत आता न्यायालयानेही नाराजी व्यक्त केली असल्याचे अनंत गाडगीळ यांनी मनात भाजपवर टीका केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here