‘शिवसेनेतून एक जरी आमदार फुटला तर…’; बाळासाहेब ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Balasaheb Thackery
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या घटनेनंतर शिवसेनेच्या गोट्यात अस्वस्थता पसरली आहे. यामुळे राज्यभरातून शिवसैनिकांचा संताप पाहायला मिळत आहे. भारतमाता चौकात सेनेच्या कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन देखील केले आहे.

यावेळी काही शिवसैनिकांनी वर्षा बंगल्यावर धाव घेत एकनाथ शिंदेंविरोधात (Eknath Shinde) घोषणाबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनीही वर्षा बंगल्यातून समोर येऊन त्यांना वज्रमूठ दाखवली. दुसरीकडे सोशल मीडियावरही एकनाथ शिदेंच्या (Eknath Shinde) अकाऊंटवर विविध नाराजीच्या प्रतिक्रिया येत आहे. त्यामुळे शिंदेच्या (Eknath Shinde) बंडामुळे शिवसैनिक नाराज असल्याचंही दिसून येत आहे.

https://twitter.com/RajaramUbhe/status/1539449608258060289

या सगळ्या राजकीय नाट्यादरम्यान बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यापुढे एकही आमदार शिवसेनेतून फुटला तर कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा, असे बाळासाहेब या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत. बाळासाहेब ठाकरेंना हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :
एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अनेक शिवसैनिक नाराज, जोरदार घोषणाबाजी करत व्यक्त केला संताप

भिवंडीत कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर मारला डल्ला, CCTV फुटेज आले समोर

दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर

बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट

पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा