हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारने घेतला. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांची लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. मात्र, केंद्र सरकारकडूनच लसीचा पुरवठा होत नसल्यामुळे हि मोहीम बंद करीत असल्याचे सांगितले. डॉ. टोपे यांनी लसीच्या तुडवड्यावरून केंद्रावर केल्या आरोपाच्या या विधानावरून भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. “आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी लसींच्या तुटवड्याबाबत केंद्रावर केलेले विधान हे खोट आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारच खोटं बोलू नये. त्यांचं हे विधान म्हणजे खोटारडेपणाचा एक कळसच आहे,” असं भातखळकर यांनी म्हंटल आहे.
राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय २८ एप्रिल रोजी महाविकास आघाडी सरकारने घेत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास सुरवात केली. मात्र, या वयोगटासाठी मागविण्यात आलेली लस हि केंद्राकडूनच कमी स्वरूपात आल्याने हि लस कमी पडत असल्याची माहिती डॉ. टोपे यांनी माहिती दिली. डॉ. टोपे यांच्या या विधानावरून भाजपच्या आमदार भातखळकर यांनी निशाणा साधला.
यावेळी आमदार भातखळकर यांनी काही प्रश्नही आघाडी सरकारला विचारले आहेत. आघाडी रस्करने २८ एप्रिल रोजी जेव्हा १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. तेव्हा त्यांनी या लसीच्या खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजुरीसाठीचा घेतलेला शासन निर्णय तब्बल नऊ दिवसांनी म्हणजे ७ रोजी काढला. या काढलेल्या निर्णयात तब्ब्ल १२ कोते कोरोनाच्या डोसची आवश्यकता असताना केवळ ७. ७९ लाख इतकेच डॉस सरकारने विकतघेण्यास का मान्यता दिली? असा प्रश्नही यावेळी आमदार भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच या प्रश्नच उत्तर डॉ. टोपे यांनी द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.