व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कार्वे पुलावरून उडी घेतलेल्या 22 वर्षीय युवतीचा मृतदेह सापडला

कराड | कराड- तासगांव मार्गावर असलेल्या कार्वे पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्त्या केलेल्या 22 वर्षीय युवतीचा मृतदेह आटके येथील कृष्णा नदीपात्रात आढळून आला. रविवारी दुपारी ही घटना समोर आली.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कराडच्या पाटण कॉलनी परिसरातील युवती शुक्रवारी दि. 24 रोजी पहाटे दुचाकीवरून घराबाहेर पडली. त्यानंतर ती कराड-तासगांव रोडवरील कार्वे पुलावर येत तिने रात्री अंधारातच कार्वे पुलावरून नदीपात्रात उडी घेतली. दरम्यान, युवती घरात नसल्याचे समजल्यावर नातेवाईकांनी शोध सुरू केला असता कार्वे पुलावर तिची दुचाकी आढळून आली.

या घटनेची खबर पोलिसांना देण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पोलिसांच्या माध्यमातुन दोन दिवसांपासुन युवतीचा शोध घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान रविवारी दुपारी आटके येथील कृष्णा नदीपात्रात संबंधित युवतीचा मृतदेह सापडला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.