भिवंडी : हॅलो महाराष्ट्र – भिवंडीमध्ये एका बार कॅशियरनेच बारमधील गल्ल्यावर डल्ला मारला आहे. मालकाने दाखवलेल्या विश्वासाला काळिमा फासत या कॅशियरने गल्ल्यातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी (Theft) केली आहे. दरम्यान बारच्या गल्ल्यातील पैसे चोरीची (Theft) ही घटना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता असे चोरी (Theft) करणाऱ्या कॅशियरचे नाव आहे. चोरी (Theft) केल्यानंतर अरविंदकुमार त्या ठिकाणाहून पसार झाला आहे. या चोरीप्रकरणी बार व्यवस्थापक रोहित मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात कॅशियरविरोधात तक्रार दाखल केली आहे.
चोरी करुन कॅशियरचा पोबारा
भिवंडी शहरातील कल्याण नाका येथे आम्रपाली बार अँड रेस्टोरंट आहे. या बारमध्ये अरविंदकुमार मोतीलाल गुप्ता हा तरुण कॅशियर म्हणून नोकरी करत होता. अरविंदकुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील रहिवासी आहे. कामानिमित्त तो भिवंडीत राहत होता. रविवारी बारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मद्यपी दारू पिऊन गेल्यानंतर रात्री बारमध्ये धंद्याची मोठी रक्कम गल्ल्यात जमा झाली होती.
https://twitter.com/RajaramUbhe/status/1539222082781065217
हि रक्कम पाहून अरविंदकुमारच्या मनात लालच निर्माण झाली. त्यानंतर अरविंदकुमार मध्यरात्री दोनच्या सुमारास गल्ल्यातील रक्कम घेऊन फरार (Theft) झाला आहे. बारमध्ये चोरी (Theft) झाल्याचे समजल्यानंतर बारमधील व्यवस्थापक रोहीत संतोष मेहता यांनी शहर पोलीस ठाण्यात कॅशियर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस बारमधील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी अरविंदकुमारचा शोध घेत आहेत.
हे पण वाचा :
बनावट क्रिप्टो एक्सचेंजने फ्रॉडद्वारे भारतीय गुंतवणूकदारांचे लुटले 1000 कोटी रुपये – रिपोर्ट
दुचाकीसह पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडाले पती-पत्नी, Video आला समोर
पुढंच्या एका तासात राज्यात काय घडत बघा; राणेंचा इशारा
शिवसेनेच्या आमदारांना गुजरात मध्ये मारहाण; संजय राऊतांचा आरोप