भुसावळ प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर माध्यमात सारख्या बातम्या झळकत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयावर भाष्य केले आहे. उदयनराजे भोसले भाजपमध्ये कधी येणार असा प्रश्न त्यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या विषयावर भाष्य केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रे निमित्त भुसावळ येथे आले असता त्यांनी त्या ठिकाणी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर भाष्य केले आहे. उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की उदयनराजेंच्या प्रवेशावर मी काय बोलू. हा त्यांचा निर्णय आहे. त्यामुळे या विषयावर माझ्या पेक्षा तेच अधिक चांगल्या पध्द्तीने भाष्य करू शकतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान उदयनराजेंनी भाजप प्रवेशावर सावध पवित्रा घेतला असल्याचे बोलले जाते आहे. तर विधानसभा निवडणुकी बरोबर त्यांनी राजीनामा दिलेल्या लोकसभा मतदारसंघाची देखील निवडणूक लावली जाणार असेल तरच ते भाजपमध्ये दाखल होतील असे देखील बोलले जात होते. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नेमके काय आहे हे येणाऱ्या काळातच समजू शकते. उदयनराजे यांनी फडणवीस यांच्या सरकारची स्तुती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले आहेत.