नवी दिल्ली । अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील दुसरे सर्वात मोठे अब्जाधीश जेफ बेझोस यांची एकत्रित संपत्ती $ 500 बिलियनच्या जवळपास पोहोचली आहे. टेस्लाच्या स्टॉकमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने गेल्या काही दिवसांत मस्कच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे.
टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने नॅस्डॅकने बुधवारी इंट्राडेमध्ये विक्रम केला. बेझोस आणि मस्क यांची एकत्रित निव्वळ संपत्ती आता टॉप फार्मास्युटिकल कंपन्यांमधील जॉन्सन अँड जॉन्सनपेक्षा थोडी जास्त आहे आणि अमेरिकेतील सर्वात मोठी बँक JP Morgan Chase च्या जवळपास आहे.
अमेरिकेतील अब्जाधीशांवर टॅक्स वाढवण्याचा प्रस्ताव
अमेरिकेतील अब्जाधीशांवर टॅक्स वाढवण्याचा प्रस्तावही सिनेटमध्ये मांडण्यात आला आहे. हे आणणाऱ्या वित्त समितीचे अध्यक्ष रॉन वायडेन यांनी सांगितले की,”सर्वोच्च इनकम टॅक्स रेट व्यतिरिक्त अब्जाधीशांवर 3 टक्के सरचार्ज लावला जाऊ शकतो.”
बेझोसची एकूण संपत्ती $196 बिलियनपेक्षा थोडी जास्त आहे
हा प्रस्ताव लागू झाल्यास, बेझोस आणि मस्क यांना पाच वर्षांत सुमारे 100 अब्ज डॉलर्स टॅक्स भरावे लागतील. मस्कच्या संपत्तीत यावर्षी 122 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यासह त्यांची एकूण संपत्ती 292 अब्ज डॉलर्सझाली आहे. बेझोस यांची एकूण संपत्ती 196 अब्ज डॉलर्सपेक्षा थोडी जास्त आहे.