आगामी काळ अनिल देशमुखांसाठी कठीण असेल; ‘या’भाजप नेत्याचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यासाठी येणारे दिवस कठीण असतील, असे सूचक वक्तव्य भाजप खासदार मनोज कोटक यांनी केले. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मंत्र्यांचं बिंग फुटणार आहे. त्यांनाही राजीनामे द्यावे लागतील, असा गर्भित इशारा मनोज कोटक यांनी दिला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात मनोज कोटक यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणाचा आतापर्यंतचा एकूण घटनाक्रम पाहता भाजप नेत्यांना अनेक गोष्टींची वेळेआधीची चाहुल लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे देशमुखांसाठी आगामी दिवस कठीण असतील, या मनोज कोटक यांच्या वक्तव्याचा अर्थ नक्की काय असावा, याविषयी सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत.

तर दुसरीकडे अनिल देशमुख हे काही काहीवेळापूर्वीच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. ते ज्ञानेश्वरी बंगल्यावरुन सांताक्रुझच्या डीआयओच्या कार्यालयात पोहोचले आहेत. त्यानंतर सीबीआयचे अधिकाऱ्यानी अनिल देशमुख यांच्या चौकशीला सुरुवातही केली आहे. अनिल देशमुख यांची चौकशी झाल्यानंतर सीबीआय सोमवारी प्राथमिक चौकशीचा अहवाल निष्कर्षासह उच्च न्यायालयात सादर करेल. त्यामुळे अनिल देशमुखांची चौकशी ही निर्णायक ठरणार आहे.

You might also like