मुंबई | मुंबई येथे झालेली बैठक ही पूर्वनियोजित होती, तसेच छ. संभाजीराजे यांनी कोणीही बैठकीत बोलायचे नाही अशी दमदाटी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांनी करत आक्रमक झाले आहेत. छ. संभाजीराजे म्हणाले होते, कोणी काही बोलले तर मी निघून जाईन. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आणि छ. संभाजीराजेंच्यातील हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी चाललेल्या या क्रांती मोर्चाच्या भूमिकेकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
मराठा क्रांती मोर्चाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहेत. आता मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या दरी निर्माण झाल्याची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. त्यामुळे संभाजी राजे यांच्या विरोधात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक एकवटले असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मराठा समाजाच्या अनेक मागण्या सरकारकडून पूर्ण करण्यात आल्या नसल्याने गेल्या काही दिवसांपासून मराठा समाज क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मोर्चा, आंदोलनं आणि निषेध करुन मराठा समाजाच्या मागण्या सरकारकडून मान्य करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू आहे. अशातच संभाजीराजे बोलू देत नाहीत, तसेच छत्रपती संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चा संपवत असल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात येत आहे. त्यामुळे छ. संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा पुढे काय भूमिका घेणरा याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.