प्रेमप्रकरणातून कराडात तरुण-तरुणीची आत्महत्या ; अल्पवयीन तरुणीचा घातपात झाल्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गेल्या पाच ते सहा दिवसापासून बेपत्ता असणार्‍या अल्पवयीन मुलीचा मृतदेह डिचोली ता. कराड गावच्या हद्दीत सोमवारी सकाळी आढळून आला. मृतदेहाच्या गळ्याला गंभीर जखम असल्याने पोलिसांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मागील पाच दिवसापूर्वी आत्महत्या केलेला युवकाचे व अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. बुधवारी दि. 9 रोजी सकाळी अल्पवयीन मुलगी घरातून कॉलेजला जाते असे सांगून गेली. त्यानंतर तिने घरी फोन करून यायला उशिर होईल असे आपल्या आईला सांगितले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी व मुलगी हे दोघे गाडीवरून टेंभूच्या बाजूला गेल्याचे निदर्शनास आले. बुधवारी अल्पवयीन मुलगा हा आत्महत्या करण्याच्या अगोदर पुलावर बराच वेळ घुटमळत असल्याचे तेथील नागरिकांनी पाहिले होते. गुरूवारी अल्पवयीन मुलाचा मृतदेह टेंभू गावच्या हद्दीत सापडला. त्याच्याजवळ ब्लेड व बँडेज असे साहित्य आढळून आले. त्या दिवसापासून अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी शहर पोलिसात दिली होती.

पोलिसांनी त्या अनुषंगाने टेंभूसह शेजारील परिसराचा शोध घेतला. मात्र, तिचा शोध लागला नाही. सोमवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास डिचोली गावच्या हद्दीत डोंगराकडील बाजूच्या कोपर्‍या शेताजवळील काढलेल्या सिमेंटच्या रिकाम्या गटारामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता अल्पवयीन मुलीच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिसांनी घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment