नवी दिल्ली | देशात करोणा अत्यंत वेगाने पासरण्यामागे SARS-Cov-2 स्ट्रेन जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. व्हायरसचा हा स्ट्रेन अनेक लोकांना बाधित करतो आहे. जर तुम्हाला सलग दोन तीन दिवस ताप आहे असे जाणवले की मग तुम्ही करोना बद्दल शंका घ्यायला हवी. त्यामुळे यावर वेळीच गंभीररत्या उपाययोजना आखणे गरजेचे आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, करोना महामारी पसरण्यामागे SARS-Cov-2 चे दुनियेत अनेक प्रकार आहेत. यामध्ये यूके, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलवाल्या प्रकाराने जास्त प्रमाणात हाहाकार माजविला आहे. दिल्लीमध्ये यूके आणि दक्षिण आफ्रिकी प्रकारच मुख्यत्वे पाहायला मिळाले आहेत. तर पंजाबमध्ये जास्तीत जास्त केसेस या यूकेच्या व्हायरस प्रकारातील आहेत.
डॉ. रणदीप गूलेरिया पुढे सांगतात की, यापूर्वी कारोनाचा एक रुग्ण आपल्या संपर्कात येणाऱ्या 30-40 टक्के लोकांनाच बाधित करू शकत होता. आता तोच आकडा 80-90 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. एखाद्या घरात रुग्ण सापडल्यास त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आजार होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चालू आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात काम करणे गरजेचे आहे. तरच कोरोनाची ही चैन तोडली जाऊ शकणार आहे.
हे पण वाचा –
पैसे डबल करण्यासाठी भारतीय पोस्टाची ‘ही’ चांगली योजना; असा घ्या फायदा
राज्यात 6 दिवस पाऊस बरसणार; जाणुन घ्या कुठे होणार मेघगर्जना
गावात राहून व्यवसाय करायचा विचार करताय? ‘या’ प्रकल्पासाठी सरकार देतंय 3.75 लाख रुपयांचं अनुदान
गोल्ड ईटीएफमध्ये 6,900 कोटी रुपयांची झाली गुंतवणूक; त्याविषयी तज्ञांचे काय मत आहे ते जाणून घ्या
PM Kisan योजनेचे पैसे अद्यापही तुमच्या खात्यात जमा नसतील तर ‘अशी’ करा तक्रार