औरंगाबाद – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (रा. शिरुर, जि. बीड) यांच्याविरुद्ध दाखल बलात्काराच्या गुन्ह्याचा ‘बी समरी’ अहवाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सचिन नेहरकर यांनी 21 सप्टेंबर रोजी फेटाळला. तपास अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भुजबळ यांनी तो अहवाल दाखल केला होता. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रकारे दणकाच बसला आहे.
या गुन्ह्याचा तपास लवकर पूर्ण करून अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने सिडको ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच सदर गुन्ह्याचा योग्य तपास होण्यासाठी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी तपासावर देखरेख आणि मार्गदर्शन करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी ‘बी समरी’ अहवाल सादर केल्यानंतर पीडितेच्या जबाबानुसार तिने घटनेनंतर संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच 15 जानेवारी 2019 रोजी न्यायालयाने तिचा जबाब नोंदवला होता. त्यात तिने मेहबूब शेख यांच्या नावाचा उल्लेख केला होता. आरोपी राजकारणी असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. उलटपक्षी वारंवार तक्रारदाराच्या घरी जाऊन तिचे चारित्र्य हनन केले. घटनेच्या वेळी तो तिथे नव्हता, या आरोपीचा जबाब पोलिसांनी विश्वास ठेवला. ‘बी समरी’ रिपोर्ट नामंजूर करून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मार्फत अथवा सीबीआय मार्फत या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश द्यावेत, असा जबाब तिने दिला होता. पीडितेचे वकील एल. मणियार यांनी पीडितेच्या जमावाचा पुनरुच्चार केला. पोलिसांनी दाखल केलेल्या बाबीसंबंधी अहवाल नामंजूर करून पुढील तपासाचा आदेश देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली होती.
पीडितेने प्रथम माहिती अहवालात आणि न्यायालयात आरोपी चा खास नामोल्लेख केला आहे. पोलिसांनी कायद्यानुसार तपास केल्या नसल्या चे व योग्य निष्कर्ष काढला नसल्याने ‘बी समरी’ अहवाल स्वीकारणे योग्य नाही. असा स्पष्ट उल्लेख करीत न्यायालयाने तो फेटाळून लावला.