धावती एसटी बस नदीत कोसळली ! सुदैवाने 25 प्रवासी बचावले

जालना – चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने 25 प्रवाशांना घेऊन जाणारी एसटी बस पाण्यात कोसळल्याची घटना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील श्रीष्टी गावाजवळील कसुरा नदी वर काल रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन बसमधील पंचवीस प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले.

परतूर तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. यातच काल रात्री परतूर आगाराची (एम एच 14 बीटी 2280) बस परतुरहून 20 प्रवासी घेऊन आष्टी कडे जात होती. या बस मध्ये दोन लहान मुलांसह ते 20 प्रवासी व चालक वाहक असे एकूण 25 प्रवासी होते. श्रीष्टी गावाजवळ कसुरा प्रकल्प आहे. सध्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत आहे. सुरा नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने पुलावरून पाणी जात होते. या पाण्याचा अंदाज आलेला असतानाही चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसल्याने बस पाण्यात कोसळली.

चालक – वाहक पसार –
बस पाण्यात कोसळतच संतप्त प्रवासी व स्थानिक ग्रामस्थांनी चालक वाघाचा शोध घेतला. मात्र, त्या दोघांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याचे दिसून आले. पाण्याचा प्रवाह वाढलेला असताना ही बस पाण्यात का घातली ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

You might also like