सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,
कवठेमहांकाळ तालुक्यात टँकर आणि चारा छावण्या सुरु करा अशी मागणी करण्यात येते आहे. तालुक्यात चार छावण्या सुरु नाही केल्यास तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.
तासगाव कवठेमहांकाळ तालुक्यातील दुष्काळी भागात तात्काळ चारा छावण्या आणि टँकर सुरू करा अन्यथा तहसीलदार कार्यालयात शेळ्या मेंढ्या सोडू असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी निवेदनावर दिला. यावेळी मागणीचे निवेदन कवठेमहांकाळचे नायब तहसीलदार अरुणकुमार कोकाटे यांना सर्व पक्षीय कृती समितीच्यावतीने जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखालीनिवेदन देण्यात आले.
गायी म्हशीसह शेळ्या मेंढ्यासाठीही चारा छावण्या किंवा चारा डेपो सुरू करावेत, जिल्ह्यसह कवठेमहांकाळ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. या परिस्थितीत चारा छावण्या आणि टँकर सुरू होणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन कोणतीही हालचाल करताना दिसत नाही. जनावरे चाऱ्या अभावी तडफडत आहेत. अनेक शेतकरी कवडीमोल किमतीने जनावरे विकत आहेत, तर पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना दिवस खर्ची घालावा लागत आहे. त्याचबरोबर बँकांची वसुली सुरू आहे तीही थांबली पाहिजे महावितरण कंपनी थकबाकी साठी कनेकशन तोडत आहे त्यांनाही कनेक्शन तोडणे थांबविण्याचा सूचना द्याव्यात यांसह अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य मन झाल्यास तहसीलदार कार्यालयात जनावरे सोडू असा इशारा ही स्वाभिमानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.