जिल्हा हळहळला ! सिल्लोड तालुक्यात शेतकरी दांपत्याची आत्महत्या

औरंगाबाद – सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी घडली. पत्नी ने विहिरीत उडी घेऊन तर पतीने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे, सततच्या नापिकीला कंटाळून दांपत्याने टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा असून आत्महत्या करणाऱ्या दांपत्याला दोन चिमुकले असून त्यांच्या अकाली जाण्याने परिसरासह जिल्हात हळहळ व्यक्त होत आहे,

याविषयी अधिक माहिती अशी की, सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील 32 वर्षीय ज्योती सदानंद गव्हाणे या विवाहितीने राहत्या घराच्या शेजारी असलेल्या विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची दुदैवी घटना घडली, या घटनेला काही मिनिटे होत नाही तर व्ह्यू पाइन्ट रस्त्यालगत असलेल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत पती सदानंद गुलाबराव गव्हाणे (39) याला पाहताच ग्रामस्थानी त्याला झाडाखाली उतरवून उपचारासाठी सिल्लोड येथे नेत असताना त्याची वाटेतच प्राणजोत मावळली.

घटनेची माहिती मिळताच साह्ययक पोलिस निरीक्षक अजित विसपुते,उपनिरीक्षक कैलास पवार आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने पत्नीचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पती पत्नीचे शव शवविच्छेदनासाठी अजिंठा ग्रामीण रुग्णालयात पाठविले, घटनेची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असुन पुढील तपास पोलीस करीत आहे,

You might also like