फक्त दिवाळीतच उघडली जातात हसनंबा मंदिराची दारे; काय आहे यामागील कारण?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजेच दिवाळी दरवर्षी धुमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी सणाच्या शुभमुहूर्तावर कर्नाटकमधील हसनंबा मंदिर वर्षातून एकदाच उघडले जाते. या मंदिरामागे गेल्या आठशे वर्षांचा इतिहास आहे. हसनांबा मंदिर 12 व्या शतकात बांधले गेले होते. त्यामुळे ते 823 वर्षे जुने मंदिर आहे. हसनंबा मंदिर दरवर्षी दिवाळीच्या एक आठवडा उघडण्यात येते. यानंतर दिवाळी संपली की मंदिर पुन्हा बंद केले जाते. आज आपण याच मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत.

हसनंबा मंदिर माहिती

हसनंबा मंदिर हे कर्नाटक राज्यात स्थित आहे. ज्याचे दरवाजे वर्षातून एकदाच भाविकांच्या दर्शनासाठी उघडले जातात. हे मंदीर पाहण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी भारतभरातून भाविक येथे येत असतात. या मंदिराचा इतिहास 800 वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते. या मंदिराला 12 व्या शतकात बांधले गेले होते. त्यामुळे हे मंदिर तितकेच भव्य आणि सुंदर आहे. या मंदिरात चमत्कारिक घटना घडल्याची माहिती येथील स्थानिक लोक सांगतात. या मंदिराला 3 दरवाजे आहेत. ज्याचा मुख्य बुरुज द्रविड शैलीमध्ये बांधलेला आहे.

वर्षभर असते मंदिर बंद

हसनंबा मंदिर फक्त दिवाळीत एक आठवड्यासाठी उघडले जाते. नाही तर मंदिर वर्षभर बंद असते. याकाळात मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. विशेष म्हणजे, या मंदिरात भक्त लोक मातेला पत्र लिहून हवी ती इच्छा मागतात. दिवाळीच्या काळात मंदिराच्या गाभाऱ्यात मातेच्या मूर्तीसमोर एक ज्योत प्रज्वलित केली जाते. तसेच तीला शिजवलेला भात नैवेद्य म्हणून दाखविला जातो. असे म्हटले जाते की, देवी माता आपल्या भक्तांनी लिहिलेल्या सर्व इच्छा पूर्ण करते. त्यामुळे दरवर्षी भाविक येथे येऊन मातेचा आशीर्वाद घेतात.

पौराणिक कथेनुसार, अंधकासुर राक्षसाने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवून पृथ्वीवर विनाश करायला सुरुवात केली होती. अंधकासुराने कठोर तपश्चर्या करून अदृश्य होण्याचे वरदान प्राप्त केले होते. त्यामुळे सर्व देवी-देवता व्यथित आणि चिंताग्रस्त होऊन भगवान शंकरापर्यंत पोहोचले. त्यांची चिंता ऐकून भगवान शंकराने राक्षसाचा वध करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी, योगेश्वरी देवीची निर्मिती केली. अखेर, या देवीनेच अंधकासुराचा वध केला. हसनंबा मंदिर म्हणजेच जोगेश्वरी देवीचे मंदिर आहे.