हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात गेल्या पाच महिन्यापासून कोरोनाने धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी पासून विजेचे वाढते बिल हि सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. अनेक तक्रार दाखल झाल्या आहेत. पण त्यावर अजून ठोस कारवाई झाली नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एक सर्वसामन्य शेतकऱ्याला विजेचे बिल हे तब्ब्ल ६४ लाख आले आहे. त्यांमुळे महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवकुमार असं या शेतकऱ्याचं नाव आहे . गेल्या अनेक वर्षपासून हा शेतकरी उत्तरप्रदेशात शेती करतात. उत्तरप्रदेश मधील बलराम या इलेक्ट्रिसिटी विभागाने त्यांना तब्ब्ल ६४ लाख रुपयाचं वीज बिल पाठवलं आहे. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे वीज बिल नाही भरलं तर ते वसूल केलं जाईल अशी नोटीस हि पाठवली आहे. त्या शेतकऱ्याने इतकं मोठं विजेचं बिल पाहून त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. नोटीस मिळण्यापासून हे कुटुंब चिंतेत आहे. शिवप्रकाश ने २०१८ च्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेमार्फत आपल्या पत्नीच्या नावाने विजेचं कनेकशन घेतलं होत. ऑक्टोबर २०१९ मध्ये पत्नी सुनीता याच्या नावावर १७०० रुपये विजेचं बिल आलं होत परंतु काही कारणामुळे ते बिल भरू शकले नाहीत.
२९ जुलै २०२० मध्ये पुन्हा एकदा विजेचं बिल आहे पण ते तब्ब्ल ६४ लाख आले आहे. आणि ते बिल ८ ऑगस्ट पर्यंत भरण्याची नोटीस त्यांना मिळाली आहे. घरातील सारी संपत्ती विकली तरी ते इतकं बिल भरू शकत नाहीत असं त्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. गेल्या दोन वर्षांपासून घरात फक्त दोनच ब्लब वापरले जातात मग इतके बिल आलं कस असा प्रश्न त्यांच्यासह इतरांना पण पडला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.