भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभ्या दुचाकीला दिली जबरदस्त धडक; महिलेचा जागीच मृत्यू

0
48
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | बेडग येथे मिरज -बेडग रोडवरती जिल्हा परिषद शाळेच्या समोर भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने रोडच्या बाजूस उभ्या असणार्‍या दुचाकीस मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील मुक्ताबाई नामदेव जाधव या महिलेचा जागीच मृत्यू झाला. यानंतर संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या.

मुक्ताबाई जाधव या मुलगा सुधाकर जाधव याच्या सोबत कोरोनाची लस घेण्यासाठी बेडग येथील जिल्हा परिषद शाळेत आल्या होत्या. लस घेतल्यावर मोटरसायकलवरून घरी जाताना रोडच्या बाजूस त्यांची मोटरसायकल थांबली होती. या दरम्यान मिरजच्या दिशेकडून भरधाव वेगाने येणार्‍या डंपरने त्यांच्या दुचाकीस मागून जोरदार धडक दिल्याने मुक्ताबाई जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.

डंपरच्या धडकेत मुक्ताबाई जाधव यांचा मृत्यू झाल्याची घटना गावभर पसरल्यानंतर हा अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी संतप्त जमावाने डंपरची हवा सोडून गाडीच्या काचा फोडल्या. अशा घटना वारंवार बेडग परिसरात होत आहे. या बाबत पाठपुरावा करण्यात ग्रामपंचायत व स्थानिक नेते हे अपयशी होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here