हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिअंटमुळे सर्वत्र गलबल उडाली आहे. त्यात भारतात संशयित रुग्ण आढळून आले असल्याने अजूनच चिंता वाढली आहे. भारतातही या व्हेरिअंटचे कर्नाटकात दोन रुग्ण आढळल्याने सुरक्षिततेची काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. दरम्यान या रुग्णांमधील 46 वर्षीय डॉक्टरमध्ये खूप जास्त थकवा, अशक्तपणा आणि ताप अशी लक्षणे आढळून आली.
कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी या व्हायरसबाबत काही माहिती दिली आहे. त्यामध्ये ओमिक्रॉन व्हेरिअंटचा आढळलेला एक रुग्ण 66 वर्षीय पुरुष असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तो 20 नोव्हेंबरला बेंगळुरूमध्ये आला होता. येथे त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्याला एका हॉटेलमध्ये आयसोलेट करण्यात आले होते. यानंतर, 23 नोव्हेंबरला त्याची पुन्हा टेस्ट करण्यात आली. ती निगेटिव्ह आली. यानंतर 27 नोव्हेंबरला तो दुबईला गेला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची टेस्ट निगेटिव्ह आली होती.तर ओमिक्रॉनचा दुसरा रुग्ण 46 वर्षीय डॉक्टर आढळला. तो एका सरकारी रुग्णालयात काम करतात. पण त्याची कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही.
दक्षिण आफ्रिकेतील शास्त्रज्ञांनीही म्हटले आहे की, या व्हेरिअंटची लक्षणे फारशी गंभीर नाहीत. तसेच सौम्य लक्षणांमुळे, बहुतेक लोकांना ती लवकर समजत नाहीत आणि संसर्ग सहजपणे पसरण्याची शक्यता असते. यामुळे यांपैकी कोणतीही लक्षणे दिसून आली, तर नक्कीच स्वतःची टेस्ट करून घ्यावि, असा सल्ला डॉक्तरांनी दिला आहे.