नारायण राणेंच्या अटकेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जन आशिर्वाद यात्रेतून केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांना आज पोलिसांनी अटक केली असल्याने याचवर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “नारायण राणे त्यांच्या संस्काराप्रमाणे बोलतात. मी त्यांच्या वक्तव्याबद्दल फारसे बोलणार नाही. तसेच त्यांच्या वक्तव्याला महत्वही देत नाही,”असे पवार यांनी म्हंटले आहे.

केंद्रित मंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रतिक्रिया दिली. यावेळी पवार यांनीही भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, मंत्री राणेंच्या अटकेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही टीका करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात कसे सहकारी निवडले आहेत याची छोटीशी चुणूक या वक्तव्यावरुन देशाला व महाराष्ट्राला मिळालेली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला आहे.