हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या राज्यावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमीक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळत असून यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण डोंबिवली, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई आणि विदर्भानंतर आता कोल्हापूरमध्ये आढळला असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात आज ओमिक्रॉनचा पहिला संशयित रुग्ण आढळून आलेला आहे. ऑस्ट्रेलियामधून आलेल्या 45 वर्षीय नागरिकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला असून ऑस्ट्रेलियातून एकूण 5 जण कोल्हापूरात आले होते. यापैकी 4 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तर एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आढळला.
वैदयकीय अधिकाऱ्यांनी संबंधित संशयित रुग्णाचे नमुने घेतले असून ते पुढील तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे. ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून कोल्हापूरमध्ये 432 प्रवासी आले असून यापैकी 330 जणांची तपासणी करण्यात पूर्ण झाली आहे. यात 300 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून 30 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. दरम्यान नागपुरात काल ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला होता. ओमिक्रॉनबाधित रुग्णावर खबरदारी म्हणून खासगी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.




