‘राधे’ चित्रपटाचे भविष्य धोक्यात; रिलीजनंतर काही तासांतच झाला लीक मग कमाईतून कसा उभारणार कोरोना रुग्णांसाठी निधी..?

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काल १३ मे २०२१ रोजी सलमानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘राधे – युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. खरतर हा सिनेमा ओटीटी आणि सिनेमा थिएटर दोन्हीकडे एकाचवेळी प्रकाशित होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी केवळ ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला. यापुढे चित्रपटाबाबत अनेकांनी अनेक विविध प्रतिक्रिया दिल्या. सलमानच्या एन्ट्रीवर अनेक मिम्स देखील बनले. मात्र गंभीर बाब हि कि हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अगदी काहीच तासांत अन्य वेबसाईटवर लीक झाला आहे. त्यामुळे चित्रपटाचे भविष्य निश्चितच धोक्यात आले आहे. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट अशी कि या चित्रपटाच्या कमाईचा एक भाग कोरोना रुग्णांसाठी प्रदान केला जाणार होता. मात्र आता हा निधी कसा उभारणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई ‘ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी सलमान खान, एस.के.एफ. प्रोडक्शन आणि निर्मात्यांनी मिळून एक निर्णय घेतला होता. राधे चित्रपट रिलीज झाल्यानंतर जे काही कमावेल त्या कमीच एक भाग पूर्णरीत्या कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी दिला जाणार होता. यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना हायसे वाटले होते. मात्र सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याचे अश्या पद्धतीने अवघ्या काहीच तासात रिलीज होणे चित्रपटाच्या भविष्यावर बोट ठेवते.

सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच सलमानने एक व्हिडीओ शेअर करीत म्हटले होते कि , “एक सिनेमा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक मेहनत करतात. खूप दु:ख होतं जेव्हा लोक पायरसी करून सिनेमा पाहतात. मी तुम्हा सर्वांकडून एक कमिटमेंट मागतो की योग्य प्लॅटफॉर्मवर योग्यरित्या सिनेमा एन्जॉय करा. तर ही आहे प्रेक्षकांची कमिटमेंट..नो पायरसी इन एंटरटेनमेंट”. यानंतरही चाहत्यांनी कमिटमेंट तोडून सिनेमा बेकायदेशीरित्या अन्य वेबसाईटवर फुकट पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी लीक केला. अर्थातच सिनेमा हिट नाही पण लीक जरूर झाला. ह्यामुळे सलमानच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया देत, चित्रपट लीक करणाऱ्या लोकांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता चित्रपटाच्या कमाईवर होणारा परिणाम निश्चितच कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी जाणाऱ्या निधीला अडचणीत आणणार हे नक्की.