हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीने पातळी ओलांडली आहे. नागरिकांचे स्थलांतर करण्याचे काम सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता आज संध्याकाळी राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले जाणार असल्याने कोल्हापूरला पुराचा आणखी फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पूरस्थितीतुन लोकांना वाचवण्यासाठी NDRF तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान दुर्दुवाने यंदा २०१९ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं. पंचगंगा नदीची पाणी पातळी आज 53 फुटावर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथील नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात आलं आहे. तसेच गरज भासल्यास एनडीआरएफच्या आणखी दोन टीम जिल्ह्यात मागवण्यात येणार आहे, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात २४ तास सलग पाऊस कोसळत आहे. पंचगंगेसह सर्व नद्यांना महापूर आल्यामुळे अनेक ठिकाणी घरात पाणी घुसत आहे. काल दोन दोघेजण वाहून गेल्याच्या घटनेनंतर जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून एनडीआरएफसह स्थानिक प्रशासन लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.