मुलगी पहायला गेला अन् लाॅकडाउनमुळे २५ दिवस तिथच अडकला; मग थेट घेतला ‘हा’ निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ना बँड ना बाजा ना वरात आणि ना कुठली शेहेनाई.फक्त टाळ्यांच्या कडकडाटात एक अनोखा विवाह संपन्न झाला. आजकाल हे दृश्य लॉकडाऊनमध्ये सतत पाहायला मिळत आहे.२५ मार्च रोजी खंडवा येथे महाराष्ट्रातील एक मुलगा लग्नासाठी मुलगी पहायला आला होता.

कोरोनव्हायरसच्या संसर्गामुळे लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आणि महाराष्ट्रातील हे कुटुंब खंडवामध्येच अडकले होते. गेल्या २५ दिवसांपासून मुलीच्या घरीच राहिल्याने या दोन्हीही कुटुंबांमध्ये समेट वाढला आणि त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निश्चय केला.या युवकाचे नाव नितीन तर मुलीचे नाव नेहा आहे.या दोघांचे आता लग्न झाले आहे.

इथे ना कुठला बॅन्ड बाजा होता ना होती वरात.दोघांनीही फक्त एकमेकांना हार घातला आणि टाळ्यांच्या कडकडाटात दोघेही विवाह बंधनात बांधले गेले. लॉक-डाऊनमध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने सांगितले की,लॉकडाऊनमुळे आम्हांला अशा प्रकारे लग्न करावे लागले याचे काहीही वाटलेले नाही उलट आम्ही आनंदी आहोत.

कुटुंबाने त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावरुन टिक टॉकद्वारे व्हिडीओ बनवून दिली.आता त्यांच हा टिक टॉक खूप व्हायरल होत आहे.त्यांच्या समाजातील लोकांना जेव्हा या लग्नाविषयी कळले त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉलवरून त्यांचे अभिनंदन केले.लॉकडाऊनच्या दरम्यान काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केलेले हे जोडपेही या क्षणांना संस्मरणीय मानत आहेत.

नवरदेव नितीन म्हणाला की,आम्ही लॉक डाउन मध्ये लग्न केले, पण आमची काहीच हरकत नाही.आम्ही आमच्या कुटुंबाच्या उपस्थितीत लग्न करून हे संस्मरणीय बनवले.नवरी नेहा म्हणाली,” आम्ही या लग्नाचा आनंद लुटला आहे, असे नाही वाटत कि आपण विचार केल्याप्रमाणे आपण लग्न केले नाही.आम्ही टिक टॉक वर व्हिडीओ बनवून आमच्या लग्नाचा आनंद घेतला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

20200424_173909.gif