कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांची आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी आज भेट घेतली. “पूर्वी नैसर्गिक आपत्ती सारखी अशी संकटे 5 ते 10 वर्षानंतर येत असत. मात्र गेल्या दोन वर्षात ही संकटे वारंवार येत आहेत. त्यामुळे धोका वाढलेला आहे, परंतु राज्यातील सरकार पुनर्वसनासाठी सकारात्मक आहे. आम्हीही पाठपुरावा नक्कीच करू असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला तर राज्य सरकारनेही दरडी कोसळून उद्ध्वस्त झालेली कुटुंबातील जी मुले राहिली आहेत. त्यांच्या भविष्याचा वेगळा विचार करावा, अशी विनंती केली.
पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित झालेले मोरगिरी-आंबेघर, मिरगाव, ढोकावळे या गावातील बाधितांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी प्रविण दरेकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार जयकुमार गोरे, भारत पाटील, कराड शहर प्रमुख एकनाथ बागडी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/206109574796473/
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोयना प्रकल्प ग्रस्तांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आहे सध्या आपल्यावरती मोठं संकट आलंय याची आम्हाला जाणीव आहे. सरकारची पुनर्वसन करण्याची मानसिकता आहे आणि ते लवकरात लवकर करून घेऊ पुढील काळात अशी आपत्ती येऊ नये यासाठी ही उपाययोजना करू.