ठाकरे विरुद्ध शिंदे सत्तासंघर्षावरील सुनावणी पुढे ढकलली; आता ‘या’ तारखेपासून होणार सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या 6 महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट व शिंदे गटात सत्तासंघर्ष दिसून येत आहे. या सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून पुढे ढकलण्यात आलेली आहे. आता हि सुनावणी पुढील महिन्यात 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या ठाकरे विरुद्ध शिंदे गटाची आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, घटनापीठाने हि सुनावणी पुढे ढकलली. शिवसेनेत पडलेली फूट, विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, राज्यातल्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आदींसह महत्वाच्या मुद्यांवर दोन्ही गटाकडून याचिका करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, आज घटनापीठाने दिलेल्या निर्णयावर सात सदस्यीय घटनापीठाने या मुद्द्यांचा फेरविचार करावा तसेच सुनावणी करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. आता 14 फेब्रुवारीला सलग सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निकाल आता पुढील महिन्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच पुन्हा लांबणीवर पडला आहे.