केंद्राने लसी दिल्या म्हणून राज्यात सर्वात जास्त लसीकरण; फडणवीसांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत कडक निर्बंध आणि लसीकरण मोहीम तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दरम्यान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत लसीकरणामध्ये महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यावरूनच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘केंद्राने मोठ्या प्रमाणात लसी दिल्या म्हणूनच हे करता आलं’ असा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केला आहे.

लसीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘ लसी आपण तयार केल्या म्हणून ठीक आहे जर परदेशातून लस मागवली असती तर काय परिस्थिती झाली असती पण केंद्राने सर्वाधिक लसींचा पुरवठा केल्यामुळे राज्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे असं मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. पुण्यातील सिरम संस्था करोना लस तयार करत आहे. पण लस बनवण्यासाठी कच्चामाल अमेरिकेतून येत होता पण तो अचानक बंद झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलल्या नंतर आता अमेरिका कच्चामाल पाठवत आहे त्यामुळे लवकरच उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढेल असे देखील फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी त्यांनी शहरातील कोविड रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात यांनी अमरावती जिल्ह्याचा कोविड परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी लसीकरण या मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी पुढे बोलताना 18 ते 44 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण करावे लागेल हा मुंबई महापालिकेने घेतलेला निर्णय योग्य ठरणार नाही असे ते म्हणाले. लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो याचा विचार करून नियोजन करावे लागते एका दिवसात सर्व लस्सी होत नाहीत अशी सूचनाही त्यांनी यवतमाळमध्ये बोलत असताना दिली आहे.

You might also like