हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक वाईट बातमी समोर आली आहे. येथे सोशल मीडिया अॅ प टिकटॅकमुळे एका कुटुंबातील दोन व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. आई आणि मुलगा अशा या दोन मरण पावलेलय व्यक्ती आहेत. करीमा (वय ३५ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे तर तिचा मुलगा हा अल्पवयीन होता.
सोमवारी रात्री करीमावर टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी तिच्या पतीकडून दबाव टाकला जात होता. यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितलं जात आहे.आपल्या आईच्या मृत्यूची बातमी मुलाला सहन झाली नव्हती आणि सायनाईड पिऊन आपला जीव दिला. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या पतीला टिक-टॉक व्हिडिओ बनवण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे तिच्या नवऱ्याची नोकरी गेली होती, परंतु तरीही तो पत्नीला व्हिडिओ बनविण्यास सांगत होता. यामुळेच कंटाळून करीमाने आत्महत्या केली.
करीमाच्या नवऱ्याचे नाव समसूद्दीन होते. तो सोन्याच्या दागिन्यांवर सोन्याचे पाणी चढवण्याचे काम करीत असे. सध्या लॉकडाऊन सुरु असल्यामुळे तो घरीच बसुन होता. यावेळी तो आर्थिक संकटातूनही जात होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार अपघातामुळे ५ ते ६ लाखांचे कर्जही घेतले होते. असे असूनही तो आपल्या पत्नीबरोबर टिक-टॉक व्हिडिओ बनवण्यासाठी आग्रह धरत होता. यामुळे संतप्त होऊन त्याच्या पत्नीने सायनाईट पिऊन आपला जीव दिला.
काही दिवसांपूर्वीच कुटुंबीयांनी त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्नही केले होते. त्या लग्नातही खूप पैसा खर्च झालेला होता. हे कुटुंब पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले होते आणि अशा टिक-टॉक व्हिडिओ बनवण्याच्या बाबतीत नवऱ्याच्या बेजबाबदार वागण्याने पत्नीला सायनाइट पिण्यास भाग पाडले होते. आई मरत असल्याचे पाहून मुलानेही सायनाईड पिऊन जीव दिला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.