हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडू मध्ये स्टेट बँकेची खोटी शाखा उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे स्टेट बँकेच्या माजी कर्मचाऱ्याच्या मुलानेच संचारबंदीमध्ये ही शाखा उघडली होती. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. स्टेट बँकेचे खरे अधिकारी ही हुबेहूब खोटी शाखा बघून आश्चर्यचकित झाले. एसबीआयचे माजी कर्मचारी यांचा मुलगा कमल बाबू याने हा प्रकार केला आहे.
वडील बँकेत कर्मचारी असल्याने कमल सतत बँकेत येत राहायचा. त्याला बँकेतील व्यवहाराची पुरेपूर माहिती होती. काही वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला त्याची आईदेखील निवृत्त झाली त्याने अनुकंपाखाली नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र नोकरी मिळायला उशीर झाल्यामुळे त्याने स्वतःचीच एक शाखा सुरु केली. तो सापडला असला तरी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
तो त्याच्या आई आणि काकीच्या खात्यावरून बँकेच्या खातेदारांना पैसे पाठवत होता. यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. या पकडलेल्या तिघांविरोधात आयपीसी ४७३, ४६९, ४८४ आणि १०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.