रेल्वेच्या बहुप्रतिक्षित NTPC परीक्षेला अखेर मिळाला मुहूर्त, 3 मार्च रोजी होणार परीक्षा

Railway
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RRB मार्फत घेण्यात येणारी NTPC ची परीक्षा ही पुढील महिन्याच्या तीन तारखेला देशभरात वेगवेगळ्या परिक्षकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सन 2018 च्या अखेरीस या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती. यानंतर, तब्बल अडीच वर्ष RRB ने परीक्षा घेतली नाही.

रेल्वेमध्ये विविध पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यामध्ये लिपिकपासून इतर वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात होती. परंतु अर्ज भरून घेतल्यानंतर ही प्रक्रिया थांबली होती. तब्बल अडीच वर्षांनी ही परीक्षा आता होणार आहे.

RRB आणि एसएससीच्या भोंगळ कारभारामुळे देशभरातील तरुणांनी 25 फेब्रुवारी रोजी ट्विटरवर #मोदीरोजगारदो #modi_job_do अश्या प्रकारे ट्रेण्ड केला होता. या ट्रेंडला प्रचंड प्रतिसाद मिळाला. जवळपास 65 लाख लोकांनी ट्विट आणि रिट्विट केले.

RRB NTPC चे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.