औरंगाबाद – वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर लग्न करू असे आश्वासन देऊन तरुणाने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन आनंदाने संसार सुरू केला. या दरम्यान त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. बघता बघता मुलगी आता 19 वर्षाची झाली. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तरुणाने चालढकल केली. मारहाण करून तिला लग्नास नकार दिला. लग्नासाठी सर्व प्रयत्न करूनही यश न आल्याने शेवटी पीडित मुलीने पैठण पोलिस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मुलासह अटक केली आहे.
पैठण शहरातील तरुणाचे तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात बुडाले. मुलगी अल्पवयीन असल्याने त्यांना लग्न करण्यात कायदेशीर अडचणी येत होती. यामुळे तरुणाने मर्गाव मधला मार्ग शोधला व 18 वर्ष पूर्ण झाल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन देत, मुलीला पैठण शहरातील घरी घेऊन आला. दोन वर्षांपासून दोघेही लग्न न करताच संसाराला लागले. या दरम्यान त्यांना मुलगी झाली. तिनेदेखील वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर मुलीने त्याच्याकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. मात्र, प्रत्येक वेळी त्याने टाळाटाळ केली. लग्नासाठी सारखा पिच्छा पुरवला ने रागावून तिला मारहाणही केली. जाने सुखी संसाराचे स्वप्न दाखवले त्याच्या मनात काय आहे हे लक्षात येताच, शेवटी तिने हतबल होऊन पैठण पोलिस ठाण्यात धाव घेतली व आपली सर्व कैफियत मांडली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक किशोर पवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांना कल्पना दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी तिची फिर्याद घेतली. पोलिसांनी त्याच्यावर कलम 376 (2), (जे), (एन), 376 (3), 323, 504 भादवि सह कलम 4, 6 पोस्को आदी गंभीर कलमांखाली पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे करीत आहेत.