नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

Devendra Fadnavis Eknath Shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात तब्बल अडीच वर्षे एकमेकांच्या हातात हात घालत चांगल्या रीतीने महाविकास आघाडी सरकार चालत होते. या सरकारला व शिवसेनेला शिवसेनेतीलच गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत सुरुंग लावला. त्यांनी नुसता सुरुंगच लावला नाही तर आपल्यासोबत निम्म्याहून अधिक सेनेचे आमदारही घेऊन गेले. शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर काल शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान सोडावे लागले. आता महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर नवे भाजपचे सरकार येणार असून एकनाथ शिंदे गट व भाजप यांच्या एकत्रितरित्या निर्माण केलेल्या नव्या सरकारचा रविवारी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठ्या प्रमाणात राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षातच कोसळले असून भाजपने नवी खेळी खेळत सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेतील शिंदे गटाने बाहेर पडत भाजपसोबाबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आज एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यपालांना आमदारांच्या पाठींब्याचे सहीचे पत्र दिले जाणार आहे. तर भाजपसोबत जाण्याचा निर्णयही घेतला जाणार आहे. त्यामुळे या नव्या भाजप व शिंदे गट याकडून नवे सरकार उभे केले जाणार असून या सरकारचा रविवारी शपथ विधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.