स्पेन, इटलीत कोरोना बळींची संख्या इतकी जास्त की अंत्यसंस्कारासाठी वेटींगलिस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । इटली आणि स्पेनमध्ये कोरोना विषाणूमुळे इतक्या लोकांचा मृत्यू झाला आहे की अंत्यसंस्कारासाठी आता वेटींगलिस्ट लागू केली गेली आहे. तेथे कोरोना विषाणूने बर्‍याच लोकांचा बळी घेतला आहे.इटलीमध्य सध्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार ही एक मोठी समस्या बनली आहे.काही ठिकाणी लॉकडाउन इतके कठोर केले आहे की कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारासदेखील येऊ शकत नाहीत.

गेल्या कित्येक दिवसांपासून इटलीमधील बर्गमो शहरातील रस्त्यावर सैनिकी ट्रक दिसत आहेत. कोरोना विषाणूने येथे इतक्या लोकांना ठार केले की मृतदेह वाहून नेण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरला नाही.सध्या ट्रकच्या या रांगेचा एक व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे.बर्गमो हे इटलीमधील असे क्षेत्र आहे जेथे कोरोनाचा कहर सर्वात जास्त आहे. एका आठवड्यात येथे ३००० लोक मरण पावले आहेत.इथे अंत्यसंस्कारालाही जाऊ देत नाहीयेत, हे सर्व मृत्यू, रूग्णालयात अशा परिस्थिती झाले कि जेथे मृताचा हात धरायला कोणीही मित्र अथवा नातेवाईक उपस्थित नव्हते. संसर्गाच्या भीतीमुळे कोणालाही रुग्णालयाला भेट देता येत नाही. बर्‍याच कुटुंबांमध्ये, इतर सदस्य स्वत: देखील आयसोलेशन मध्ये आहेत.

या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूनंतर,त्याचे कुटुंबाला त्याच्या शरीरापासून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे,जेणेकरुन इतरांना हा संसर्ग होऊ नये. ज्याच्या नातेवाईकाचे निधन झाले आहे, त्याला एकटेच दु: ख करावे लागत आहे.आतापर्यंत मृत्यू नंतर अंत्यसंस्काराच्या वेळी एक विशेष प्रकारचा आदर करण्याची परंपरा सर्वत्र प्रचलित आहे. असे दिसते की कोरोना महामारीमुळे, ती देखील संपुष्टात येणार आहे. इटली आणि स्पेनमध्ये देशभरात लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही अंत्यसंस्कारास प्रवेश घेण्याची परवानगी नाही. सरकारच शेवटचे संस्कार करीत आहे. आणि मृत्यूची संख्या इतकी जास्त आहे की शेवटच्या संस्कारांसाठी वेटींगलिस्ट चालू आहे.

ओळखीच्या लोकांच्या मृत्यूनंतर लोक फोनवर किंवा व्हिडीओ कॉलवरूनच एकमेकांना दिलासा देतायत. याशिवाय इतर काहीही करू दिले जात नाहीये.एका शेजाऱ्याने आपला जीव गमावला, आता हे केवळ वृत्तपत्र किंवा स्थानिक बातम्यांच्या साइटवरूनच कळत आहे १३ मार्च रोजी बर्गामोच्या एका स्थानिक वृत्तपत्रात दहा पाने शोक संदेश होते. तसेच तेथील एखाद्याच्या मृत्यूनंतर, रस्त्यावर एक जागा तयार केली गेली आहे, जिथे मृताच्या फोटोबरोबरच त्याच्या मृत्यूची बातमी सांगितली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

हे पण वाचा –

पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तुमचे नाव आहे का? ‘इथे’ करा चेक, वर्षाला मिळतात ६ हजार रुपये!

राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ, संख्या पोहोचली १४७ वर; तुमच्या जिल्ह्यात किती?

महाराष्ट्राच्या जायबंदी जनतेला पडलेला को-रोमँटिक प्रश्न – “काय सांगशील ज्ञानदा..?”

भारतात या ठिकाणी रोबोट करणार कोरोना रुग्णांची देखभाल!

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन