नवी दिल्ली । लॉकडाऊनच्या काळात नागरिकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आली आहे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. १ मे म्हणजे आजपासून गॅस सिलिंडर स्वस्त झालेत. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडर १६२.५० रुपये स्वस्त झाले आहे. त्यामुळे तेथील ग्राहकांना ५८१.५० रुपये मोजावे लागतील.तर मुंबईत एपीजी गॅसची किमत ५७९ इतकी असेल. याआधी मुंबईकरांना ७१४.५० रुपये द्यावे लागत होते. कोलकातामध्ये किमती १९० रुपयांनी कमी झाल्या आहेत. तर चेन्नईत किमती ७६१ वरून ५६९.५० इतकी झाली आहे. अर्थात प्रत्येक राज्यात राज्य सरकारच्या करानुसार किमती कमी जास्त होतील.
इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतीचा आढावा घेतात त्यानुसार या किमती कमी झाल्या आहेत. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कमी होण्याचे कारण गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण होय. यामुळे सलग तिसऱ्यांदा अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. याचा देशातील १.५ कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असल्यातरी देशातील लॉकडाऊनच्या ३८ व्या दिवशी पेट्रेल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतूक बंद असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. दरम्यान, केंद्र सरकारनं लॉकडाऊन आणखी दोन आठवडे वाढवण्यात आल्याची घोषणा केली आहे. आता १७ मेपर्यंत देशात लॉकडाऊन चालू राहणार आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.