आई-वडिलांच्या प्रेमाची मुलीला मिळाली शिक्षा, नेमके काय घडले ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये आई-वडिलांच्या प्रेमाची शिक्षा (punishment of the love) त्यांच्या लेकीला मिळाली. या मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिला आहे. मुलीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील तरुणीसोबत लग्न केलं होतं. मुलीच्या मृत्यूनंतर निराधार आई मुलीचा मृतदेह घरी घेऊन आली. तब्बल 24 तास मृतदेह घरात पडून होता. त्यांचे कोणतेच नातेवाईक माणुसकीच्या नात्यानेही त्यांच्या मदतीसाठी आले (punishment of the love) नाहीत. यानंतर समाज सेवकांनी मृतदेहाला खांदा देऊन मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोहोचवला. त्यानंतर मृत मुलीच्या छोट्या बहिणीने सर्व अंत्यसंस्कार केले.

काय आहे प्रकरण ?
मृत पूजा सोनीच्या वडिलांनी दुसऱ्या जातीतील महिलेसोबत लग्न केलं होतं. ही गोष्ट त्यांच्या नातेवाईकांना आवडली (punishment of the love) नव्हती. तिच्या वडिलांना 11 भाऊ आहेत. वेळ सर्व ठीक करेल असा विचार करून ते भोपाळला काम करण्यासाठी निघून गेले. त्यांना दोन मुली आहेत. मोठी मुलगी पूजाचं लग्न गेल्या वर्षी भोपाळमधील गांधीनगरमध्ये झालं होतं. लग्नाच्या एका वर्षात पूजाच्या सासऱ्यांनी तिला घराबाहेर काढलं. यादरम्यान पूजाच्या वडिलांचा मृत्यू झाला.

त्यानंतर महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन डिंडोरीला आली. यावेळी आजारपणामुळे पुजाचा मृत्यू झाला. मृतदेह कसाबसा तिची आई घरी घेऊन आली. मात्र मुलीच्या मृतदेहाला खांदा देण्यासाठी कोणीच आलं नाही. तिच्या वडिलांनी वेगळ्या जातीतील मुलीशी लग्न केल्याची शिक्षा मुलीला (punishment of the love) भोगावी लागली. शेवटी समाज कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मुलीवर अंत्यसंस्कार करण्यास मदत केली.

हे पण वाचा :
गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ; राऊतांचे ट्विटद्वारे बंडखोर आमदारांना आवाहन

Cheteshwar Pujara ने भारतीय संघातील पुनरागमनाचे श्रेय रणजी ट्रॉफी-कौंटी क्रिकेटला दिले

अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते- नाना पटोले

काही झाले तरी आम्हीही उद्धव ठाकरेंसोबत”; नाना पटोलेंनीही स्पष्टच सांगितले

आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!

Leave a Comment