Bank FD : आता ‘या’ विदेशी बँकेने देखील आपल्या FD वरील व्याज दरात केली वाढ !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Bank FD : फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे. आजही अनेक लोकं FD मध्येच गुंतवणुक करणे पसंत करतात. हे लक्षात घ्या कि, गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा सर्वांत चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये गॅरेंटर्ड रिटर्न देखील दिला जातो. तसेच यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो.

10 Things To Know Before Taking A Loan Against Fixed Deposit - Goodreturns

RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या FD वरील व्याजदर वाढवले आहेत. अशातच आता प्रमुख विदेशी कर्ज देणारी Deutsche Bank नेही आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँक आता 5 वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याजदर देत आहे. Bank FD

Deutsche Bank (DBK) Names Wynaendts to Succeed Chairman Achleitner -  Bloomberg

Deutsche Bank कडून 1 वर्ष 1 दिवस ते जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंतच्या विविध कालावधीच्या FD च्या ऑफर दिल्या जातात. आता गुंतवणूकदारांना 1 वर्ष 1 दिवसाच्या कालावधीसाठी 6 टक्के व्याजदर मिळेल. जर एखाद्याने यामध्ये 10 लाख रुपये जमा केले तर त्याला 61,537 रुपये रिटर्न मिळेल. म्हणजेच त्याला 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,061,537 रुपये मिळतील. Bank FD

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD  Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

तसेच Deutsche Bank कडून 2 वर्ष आणि 1 दिवसाच्या FD साठी 6.25 टक्के व्याज दर देण्यात येतो आहे. यामध्ये 10 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1,26,493 रुपयांचा रिटर्न मिळेल. येथे गुंतवणूकदारांना 3 वर्षे 1 दिवस, 4 वर्षे 1 दिवस आणि 5 वर्षांच्या कालावधी निवडता येईल, ज्यावर 7 टक्के व्याज दर मिळेल. Bank FD

मुदत                 व्याज दर

1 वर्ष 1 दिवस        6.00 टक्के
2 वर्षे 1 दिवस        6.25%
3 वर्षे 1 दिवस        7.00%
4 वर्षे 1 दिवस        7.00%
5 वर्षे                    7.00%

Deutsche Bank Raided by Police in Frankfurt

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.deutschebank.co.in/en/advantage-banking/fixed-deposit-overview/resident-fixed-deposits.html

हे पण वाचा :

Atal Pension Yojana : ‘या’ सरकारी योजनेत दरमहा 210 रुपये जमा करून मिळवा मासिक पेन्शन !!!

Multibagger Stock : ‘या’ शेअर्सने गेल्या 2 वर्षात दिला 3200% रिटर्न !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजची नवीन किंमत तपासा

खुशखबर !!! Indusind Bank कडून फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ

Aadhaar Card शी संबंधित कोणत्याही माहितीसाठी अर्ज कसा करावा ??? समजून घ्या