हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर सुरू आहे. यामुळे, आज निवडणूक आयोगाने आपल्या निर्णयाचा आढावा घेतला असून आरोग्य अधिकाऱ्यांनी क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींच्या बोटाला मतदानादरम्यान वापरण्यात येणारी शाई लावण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला.
तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूची ५ नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील चार इंडोनेशियन नागरिक आणि त्यांचा चेन्नई येथील गाईड यांची सलेम मेडिकल कॉलेजमध्ये कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली.२२ मार्चपासून त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आज संपूर्ण देशात कोरोना रूग्णांची संख्या ५६२ वर पोहोचली आहे. यातील ५१९ लोक भारतीय आहेत.४३ लोक परदेशातील आहेत. तर मृतांचा आकडा ९ वर पोचला आहे.
बुधवारी, कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी लोकांना घरांमध्येच राहण्याचे आदेश दिले गेले. सरकारच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पोलिस-प्रशासन पूर्णपणे सक्रिय झाले आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
गुड न्यूज! महाराष्ट्रातील पहिल्या करोनाग्रस्ताला डिस्चार्ज
एक महिला जिच्यामुळे संपूर्ण देशात पसरला कोरोना व्हायरस
कोरोनाची लागण झालेल्या गर्भवती महिलेच्या मुलासही होऊ शकतो संसर्ग ? जाणून घ्या
‘खरंच…कोरोना विषाणू हवेतून पसरत आहे का? पहा काय म्हणतंय WHO…
सावधान : शरीरात ही ३ लक्षणे दिसल्यास समजून घ्या की आपण कोरोना विषाणूने संक्रमित आहात, जाणून घ्या