हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या गुप्तहेरांच्या संपर्कात आलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांबरोबरच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पाकिस्तानी उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या या दोन्ही गुप्तहेरांनी भारतीय सैन्याच्या हालचालीशी संबंधित माहिती गोळा करण्यासाठी रेल्वे भवनात सापळा रचला होता, सध्या रेल्वेच्या या दोन्ही कर्मचार्यांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे.
पाकिस्तानी गुप्तहेरांशी कनेक्शन असल्याच्या संबंधात, रेल्वेच्या २ कर्मचार्यांची दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने चौकशी केली आहे. या चौकशीनंतर दोघांनाही सोडण्यात आले. चौकशी दरम्यान रेल्वेच्या दोन्ही कर्मचार्यांनी सांगितले की, पाकिस्तानी उच्चायुक्तालयात कार्यरत आयएसआय एजंट आबिद आणि ताहिर यांनी बडोदा हाऊसच्या बाहेर त्यांची भेट घेतली होती. या रेल्वे कर्मचार्यांना अडकविण्याचा प्रयत्न त्या दोघां गुप्तहेरांनी केला. रेल्वेमध्ये सरकारी नोकरी कशी मिळवायची याबद्दलची माहिती त्यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी एजंट त्यांच्या मिशनमध्ये यशस्वी ठरले असते,मात्र त्यांनी विचारलेल्या काही प्रश्नांमुळे रेल्वे कर्मचार्यांना त्यांचा संशय आला. ते प्रश्न काय होते ते जाणून घेऊयात?
१. भारतीय सैन्य रेल्वेच्या कोणत्या बोगीमधून जातात?
२.भारतीय सैन्य रेल्वेमध्ये कसे येतात?
३. भारतीय सैन्याच्या पर्सनल ट्रेनची सुरुवात केव्हा आणि कशी होते?
या प्रश्नांनी रेल्वे कर्मचार्यांना आबिद आणि ताहिरचा संशय आला, मात्र या लबाड गुप्तहेरांनी आपला भाऊ पुस्तक लिहित आहे, ज्यासाठी ते माहिती गोळा करीत आहेत, असे सांगून रेल्वे कर्मचार्यांना फसवण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानी दूतावासात तैनात असलेल्या या एजंट्सने त्यांच्या जाळ्यात सैन्याच्या एका सार्जंटला पकडले होते, जो वाहतूक विभागात पोस्ट ड्युटी करत असे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या हवालदाराची चौकशी करण्याची परवानगी मागितली, तेव्हा सैन्यातून या हवालदाराचे कोर्ट मार्शल झाले असल्याचे सांगण्यात आले.
पाकिस्तानी हाय कमिशनमध्ये काम करणारे अबीद हुसेन आणि मोहम्मद ताहिर खान यांना दिल्लीच्या लष्करी इंटेलिजेंस आणि स्पेशल सेलने दिल्लीच्या करोल बाग येथील रेस्टॉरंटमध्ये पकडले. या जासूस रॅकेटमध्ये आबिद आणि ताहिरसह सहभागी असलेला त्यांचा चालक जावेद यालाही पकडण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.