हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना रुग्ण कमी होत असतानाचं एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून नवीन करोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्याच्या काळजीत भर पडली आहे. शनिवारी राज्यात कोरोनाचे नवीन ३ हजार ६११ रुग्ण आढळले होते तर आज तोच आकडा ४ हजार ९२ इतका झाला असूनही एकप्रकारे धोक्याचे घंटाच असल्याचे मानले जात आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५३ लाख २१ हजार ६०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ६४ हजार २७८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७४ हजार २४३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
दरम्यान राज्यात आज ४० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीने ५१ हजार ५२९ जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यातील कोरोना मृत्यूदर सध्या २.५ टक्के एवढा आहे. राज्यात आज दिवसभरात ४ हजार ९२ नवीन रुग्णांची नोंद झाली तर त्याचवेळी १ हजार ३५५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण १९ लाख ७५ हजार ६०३ करोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ टक्के एवढे झाल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’